Tuesday, October 11, 2022

अंधेरी पोटनिवडणुक ; ... तर उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही !; निवडणुकीत नवा ट्विस्ट...

वेध माझा ऑनलाइन -  अंधेरी पूर्व मतदारसंघातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. ही निवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान आता या पोटनिवडणुकीपूर्वी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत होणार आहे. 
पोटनिवडणुकीतील प्रस्तावित उमेदवार ऋतुजा लटके या महापालिकेत परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी 1 महिन्यापूर्वी राजीनामा दिला आहे. मात्र, हा राजीनामा अद्याप BMC प्रशासनानं स्वीकारलेला नाही. जर राजीनामा स्वीकारला नाही तर त्या अंधेरी पोटनिवडणुकीत अर्ज भरू शकणार नाहीत.
 14 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी आता फक्त तीन दिवस बाकी आहेत. अशात राजीनामा स्वीकारला गेला नाही तर त्यांना उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे ठाकरेंच्या अडचणीत वाढ होते की काय ? अशी परिस्थिती आहे

अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी आयोगाने आचारसंहिताही लागू केली आहे. 3 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत. अशातच आता अंधेरी पोटनिवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. आता नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



No comments:

Post a Comment