Monday, October 31, 2022

संपत्ती नावावर करून घेण्यासाठी पोटच्या पोराने बापाला रिवाल्वरचा धाक दाखवला ; उंब्रज येथील प्रसिद्ध नितीराज पंपचे मालक प्रल्हाद घुटे यांची पोटच्या पोराविरुद्ध पोलिसात तक्रार ; गुन्हा दाखल...

वेध माझा ऑनलाइन - संपत्ती नावावर करून घेण्यासाठी पोटच्या पोराने बापाला रिवाल्वरचा धाक दाखवला व जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उंब्रज येथे घडली आहे याबाबत मुलगा सून नातू नातसुन यांच्यासह नऊ जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतःच्या बापाला संपत्ती नावावर करून घेण्यासाठी मुलगा सून नातू नातसुनेसह अन्य पाच ते सहा जणांनी रिवाल्वरचा धाक दाखवून जबर मारहाण केली तसेच संपत्तीचे बेकायदेशीरपणे कुलमुखत्यार पत्र व बक्षीस पत्र करून घेतल्याची तक्रार उंब्रज येथील प्रल्हाद गणपती घुठे यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल केली आहे...नितीन घुटे वंदना घुठे शुभम घुटे टीना घुटे यांच्यासह उत्तम आनंदा केंजळे कल्याण खामकर गणेश पोतेकर संदीप पोतले दिगंबर माळी अशी संशयित आरोपींची नावे आहेत...

प्रल्हाद घुठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  ते स्वकष्टार्जीत नीतीराज या बंगल्यात राहण्यास असून या ठिकाणी मुलगा नितीन हा वारंवार तुमची सर्व संपत्ती माझ्या नावावर करा असा तगादा लावत होता तसेच सर्व मिळकती हडपण्याच्या उद्देशाने बक्षीस पत्र द्यावे या हेतूने मुलगा सून नातू नातसून यांनी संगनमताने आपणास खोलीत कोंडून ठेवून मुलगी जावई नातेवाईकांना भेटण्यास मज्जाव केला.. तसेच उपाशीपोटीही ठेवले जात होते मुलगा नितीन याने बक्षीस पत्र करून देण्यासाठी रिव्हॉलवर घेऊन दमदाटी केल्याचा दावा तक्रारी द्वारे करण्यात आला आहे.. यावेळी इच्छेविरुद्ध मला मारहाण करून माझी मालमत्ता जबरदस्तीने घेण्यासाठी भाग पाडून कुलमुखत्यार पत्र हे मुलगा यांनी स्वतःचे नावे व बक्षीस पत्र नातू शुभम घुठे याचे नावे बेकायदेशीर पद्धतीने करून घेतले असे तक्रारीत म्हटले आहे.. याबरोबरच उत्तम केंजळे शुभम घुटे व ड्रायव्हर कल्याण खामकर यांनी माझ्या संपूर्ण प्रॉपर्टी चे ओरिजनल फाईल आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड चेक बुक पासपोर्ट साईजचे फोटो या वस्तू नेले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे अधिक तपास करीत आहेत

उद्यापासून गॅस च्या दरात बदल होण्याची शक्यता ? एलपीजी, सीएनजी आणि पीएनजी गॅसचे दर वाढणार ?

वेध माझा ऑनलाइन - उद्यापासून नोव्हेंबर महिना सुरु होत आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीसहीत अनेक वस्तूंच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. 

अलीकडच्या काळात जागतिक बाजारपेठेमध्ये गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सरकारने गॅसचे दर निश्चित करण्यासाठी एक समिती देखील स्थापन केली होती, जी आज आपला रिपोर्ट जाहीर करणार आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरला पुन्हा एकदा एलपीजीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता  आहे अशातच जागतिक बाजारपेठेत गॅसच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे वाहनचालकांना पुन्हा एकदा झटका बसू शकतो त्यामूळे महानगरांमध्ये सीएनजीच्या दरात वाढ करू शकतात, अशी शक्यता आहे तसेच पाईपद्वारे घरांना पुरवल्या जाणाऱ्या पीएनजीच्या किंमतीतही वाढ झाल्याचा अंदाज आहे यापूर्वीही नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. 

नोव्हेम्बरमध्ये 10 दिवस बँका राहणार बंद ; ते दहा दिवस कोणते? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - उद्यापासून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे  नोव्हेंबरमध्ये बँकांना 10 बँक सुट्ट्या असतील त्या सुट्ट्यांची लिस्ट पहा...

नोव्हेंबर 2022 मधील बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट खालीलप्रमाणे...
नोव्हेंबर 1 – कन्नड राज्योत्सव आणि कुट मुळे बेंगळुरू आणि इंफाळमध्ये बँक सुट्टी असेल.
6 नोव्हेंबर – रविवारमुळे बँका बंद राहतील.
८ नोव्हेंबर – गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा, रहस पौर्णिमा आणि वांगला उत्सव साजरा केला जाईल, त्यामुळे बँका बंद राहतील.
11 नोव्हेंबर – बंगळुरू आणि शिलाँगमध्ये वांगला उत्सव आणि कनकदास जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.
12 नोव्हेंबर – महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी बँका बंद राहतील.
13 नोव्हेंबर – रविवार असल्यामुळे सुट्टी आहे.
20 नोव्हेंबर – रविवार साप्ताहिक सुट्टी आहे.
23 नोव्हेंबर – सेंग कुत्स्नेम सणानिमित्त शिलाँगमध्ये बँकेला सुट्टी असेल.
26 नोव्हेंबर – महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
27 नोव्हेंबर – रविवार आहे आणि त्यामुळे या दिवशी बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.

पन्नास हजार रुपयाची लाच करणारा कराड तहसील कार्यालयातील लोकसेवक एसीबीच्या जाळ्यात ; कुणबी दाखल्याचे काम करण्यासाठी मागितली लाच ; गुन्हा दाखल...

वेध माझा ऑनलाइन - कुणबी दाखल्याचे काम करून देण्याच्या बदल्यात पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करणारा कराड तहसील कार्यालयातील लोकसेवक एसीबीच्या जाळ्यात अडकला त्याच्याविरोधात आज कराड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला आहे

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या भाचीचे कुणबी  दाखल्याचे काम संबंधित अधिकाऱ्याकडून करून देतो असे सांगून पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी कराड तहसील कार्यालयातील विक्रम वसंत शिवदास  राहणार मालखेड सध्या ढेबेवाडी फाटा मलकापूर यांच्यावर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.. तक्रारदाराच्या भाचीचा कुणबी जातीचा दाखला काढून देण्यासाठी स्वतः करता व संबंधित अधिकाऱ्यांकरता पन्नास हजार रुपये लाचेची मागणी शिवदास यांनी केल्याचे निष्पन्न झाले या अनुषंगाने सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. कराड शहर पोलीस ठाण्यात शिवदास यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव पोलीस उपाधीक्षक सुजय घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी पोलीस अंमलदार संजय कलगुडगी धनंजय खाडे प्रीतम चौगुले यांनी केली

पायी दिंडीत कार घुसली ; सात वारकरी जागीच ठार ; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर;

वेध माझा ऑनलाईन - कार्तिकी एकादशी सोहळ्याला निघालेल्या वारकऱ्यांसोबत दुर्दैवी घटना घडल्याची घटना समोर आली आहे. पायी दिंडीत कार घुसली. यामुळे सात वारकरी जागीच ठार झाले आहेत. तर सहा जण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना सांगोला तालुक्यातील जुनोनी गावानजीक घडली. तर हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी गावातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत -
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मृतांची नावे पुढील प्रमाणे -
1)शारदा आनंदा घोडके 61 वर्ष
2)सुशीला पवार
3)रंजना बळवंत जाधव
4)गौरव पवार 14 वर्ष
5)सर्जेराव श्रीपती जाधव
6)सुनिता सुभाष काटे
7)शांताबाई शिवाजी जाधव
या भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने कार्तिकी यात्रेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी केले ट्विट -
सांगोला-मिरज मार्गावर एका दुर्दैवी अपघातात कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे जाणार्‍या काही वारकर्‍यांचा मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्विट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.


आदित्य ठाकरेंची सडेतोड पत्रकार परिषद ; दिले देवेंद्र फडणवीस यांना थेट चॅलेंज ; काय आहे ते चॅलेंज?...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरातमध्ये जात आहे. ‘वेदांता फायरफॉक्स’ आणि ‘टाटा-एअरबस’ यानंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने सत्ताधारी-विरोधकांमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचे राजकीय आरोपही होत आहेत. हा वाद सुरू असतानाच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारेवर धरले. या खोके सरकारमुळे राज्य मागे पडत असल्याचा आरोपही ठाकरेंनी केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी आव्हान दिलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस यांच्या आरोपांना प्रत्त्युत्तर दिलं. ह्या डबल इंजिन सरकार आपलं अपयश झाकण्यासाठी आमच्यावर आरोप करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी समोरासमोर बसून चर्चा करण्यास तयार असल्याचं आव्हान केलं आहे.


आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
मुख्यमंत्र्यांकडून उत्तर अपेक्षित होते. परंतु, उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. पॉवर कुणाकडे आहेत ते कळले. मुख्यमंत्र्यांनी स्क्रिप्ट वाचून दाखवले तरी चालेल.

उद्योग बाहेर जाण्याची मालिका सुरू

वेदांतापेक्षा मोठा उद्योग आणणार होते. दीड लाख कोटी कुठे व दोन हजार कोटी रूपये कुठे?

भाजप सरकार असताना अशा घोषणा होत नव्हत्या

23 मे 2022 मध्ये डावोसमध्ये असताना रायगडमध्ये 20 हजार कोटींचा प्रकल्प एमवोयू केले होते. पण त्याचे क्रेडीट हे सरकार घेतंय.

उपमुख्यमंत्र्यांना चुकीचे ब्रिफिंग मिळालंय. फोक्सकॉनचा वेगळा प्रकल्प आहे तर वेदांता फोक्सकॉनचा वेगळा प्रकल्प आहे. त्यामुळं बदनामी करू नका

वेदांता फॉक्सकॉन बाबत मी टाईमलाईनही देतोय. 24 फेब्रूवारी 2022 ला पुण्यात जावून साईट व्हिजिट केली होती.

गुजरातपेक्षा 10 हजार कोटी जास्त सबसिडी दिली होती

वेदांता फॉक्सकॉनच्या तुलनेत सध्याची गुंतवणूक खूप छोटी

सप्टेंबर 2021 मध्ये गुजरातमध्ये जाणार होते, तर मग ते आमच्यासोबत काय टाईमपास करत होते का?

खोके सरकारप्रमाणे हे खोटे सरकार आहे

बल्क ड्रग पार्क व मेडिकल डिव्हाईस पार्कसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवले आहेत. प्रस्ताव पाठवला नाही हे चुकीचे आहे.नियोजन विभागाच्या अमिताभ कांतना भेटले होते सुभाष देसाई.

मी देवेंद्र फडणविसांना चँलेंज करतो की त्यांनी टाटाच्या त्या संबंधित अधिका-याचे नाव सांगावे

आपले अपयश झाकण्यासाठी ते केंद्राला दोष देतायत असं वाटतंय.

नोकरीसाठी आंदोलन करणा-यांना शेंबडी पोर म्हणणं अपमानकारक आहे. शब्द मागे घ्या..पत्रकारांनाही एचएमव्ही पत्रकार संबोधले गेले.

समृद्धीचे उद्घाटन होवू नये म्हणून तो पूल पाडला गेला का? अजून का उद्धाटन का केले गेले नाही. सीएमनी स्पष्ट करावं.

उपमुख्यमंत्री असेही बोलले की बाकी आमदारांनी 50 खोके घेतले असा याचा अर्थ नाही. 50 खोके प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.

तत्कालीन UD मंत्र्यांना कॉर्नर करायचा प्रयत्न आहे का? पुणे नागपूरचीही चौकशी करावी. मुंबईची बदनामी केली जातंय.

राखरांगोळी करणारे प्रकल्प राज्यात आणले जातायत. नाणारला स्थानिकांचा विरोध होता. बारसूबाबतही तीच भूमिका आहे. लोकांसोबत आम्ही आहोत.


 

आज मुख्यमंत्री अचानकपणे सातारा दौऱ्यावर ; दरे या त्यांच्या मूळ गावी मुख्यमंत्री शिंदे आल्याची माहिती...

वेध माझा ऑनलाईन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे आज  साेमवारी सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आले आहेत अशी माहिती मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी अचानक रात्री उशिरा हा दौरा ठरला त्यांचे हेलिकॉप्टरने  सातारा जिल्ह्यात आगमन झाले.सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी व जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी त्यांचे स्वागत केले. आज मुख्यमंत्री आपल्या घरच्या लोकांना वेळ देणार असल्याचे समजते
दरम्यान,ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री शिंदे आलेल्या हेलिकॉप्टर मधून त्याचवेळी महत्वपूर्ण बैठकीसाठी ठाण्याला रवाना झाल्याची माहितीही मिळत आहे 

Sunday, October 30, 2022

गुजरात मधून पूल कोसळून अपघात ; पूल तुटला त्यावेळी अंदाजे 400 जण होते पुलावर ! ;

वेध माझा ऑनलाईन - गुजरातमधून मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या राजकोटमधील मोरबी भागात पुल कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुल तुटला त्यावेळी 400 लोक तेथे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल सुमारे 7 महिन्यांपासून बंद होता. केबल ब्रिज बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात येत आहे. नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या अपघातानंतर केबल पुलाचे अनेक फोटो समोर आले असून, त्यात पूल मधूनच तुटून नदीत बुडाल्याचे दिसून येत आहे. पूल तुटल्यानंतर अनेकजण मधोमध अडकले असून, तुटलेला पूल धरून कसेतरी सुटण्याचा प्रयत्न करत असल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.
मोरबी येथील अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी बचाव कार्यासाठी तात्काळ पथके तयार करण्यास सांगितले आहे. पीएम मोदींनी परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास आणि बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत देण्यास सांगितले आहे.

 

पोलीस ठाण्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा नाही ; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय...

वेध माझा ऑनलाइन - आज मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. पोलीस ठाण्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून देण्यात आला आहे.सरकारी गोपनीयता कायद्यामधील कलम तीन आणि दोन या कलमांचा हवाला देत हा निर्णय जाहीर केला आहे

मार्च 2018 मध्ये पोलीस ठाण्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी रवींद्र उपाध्याय नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी गोपनीयता कायद्यांतर्गत या कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. उपाध्याय हा त्याच्या शेजाऱ्यासोबत झालेल्या वादात पत्नीसह वर्धा पोलीस ठाण्यात गेला होता. त्यावेळी त्याने तक्रार नोंदवतानाच पोलीस ठाण्यातील चर्चेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवत आरोपपत्र दाखल केले. यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही कारवाई चुकीची ठरवत अर्जदार रवींद्र उपाध्यायला मोठा दिलासा दिला आहे.

सरसंघचालक मशिदीमध्ये इस्लाम कबूल करायला गेले होते का? शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा आशिष शेलार याना जशास तसा पलटवार...

वेध माझा ऑनलाइन - मराठी मुस्लिम सेवा संघ उद्धव ठाकरेंचं समर्थन करतो, असा लेख सामनामध्ये काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. ही संघटना मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मराठवाड्यात सक्रीय आहे, असा दावा या लेखात करण्यात आला होता. सामनामधल्या या लेखामधून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुस्लिम आणि मराठी मतं हवी आहेत. राजकीय स्वार्थासाठी चतुराईने शब्दांचा खेळ केला गेला आहे. भाजप मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार आणि या तुष्टीकरणाच्या राजकारणाबद्दल जागरुकता निर्माण करेल,' असं आशिष शेलार म्हणाले.
आशिष शेलार यांच्या या टीकेवर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे. 'आम्ही मराठी मुस्लिम असा उल्लेख केला आहे, त्यावरून आशिष शेलार यांनी भ्रम निर्माण केला आहे. सरसंघचालक मशिदीमध्ये इस्लाम कबूल करायला गेले होते का? आशिष शेलारांनी हे सांगावं,' असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं आहे.

पेडणेकरांविरोधात द्वेषाचे राजकारण
दरम्यान एसआरए घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी करण्यात येत आहे. पेडणेकर यांच्या बाबतीत हलकट आणि द्वेषाचं राजकारण सुरू आहे. जे भाजपला जुमानत नाहीत, त्यांच्या बाबतीत असे राजकारण केलं जात आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री सण-उत्सवात व्यस्त
मिहानमध्ये होणारा प्रकल्पही राज्याबाहेर गेला. एकूण सात प्रकल्प राज्याबाहेर गेले. मुख्यमंत्र्यांना वेळ नाही ते सण-उत्सव साजरे करण्यात व्यस्त आहेत. तर उपमुख्यमंत्र्यांना कट कारस्थानाचं राजकारण करण्यापासून वेळ मिळत नाही. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं प्रभारी चार्ज द्या, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे

'रवी राणा खरं बोलत असतील तर खोके 
कोणामार्फत गेले हे स्पष्ट झालं पाहिजे. शिंदेंकडून खोके गेले का फडणवीस यांच्याकडून? हे जाहीर झालं पाहिजे. सोडून गेलेले आमदार हिंदुत्वासाठी गेले, त्या 40 जणांनी मंत्रिपद सोडून भगवी पताका घेऊन हिंदुत्वाचा प्रचार केला पाहिजे. अब्दुल सत्तार यांना एखाद्या मठाचं मठाधिपती करा,' असा निशाणा सुषमा अंधारे यांनी लगावला.

आणखी एक प्रकल्प गेला राज्यातून बाहेर ; कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ? ; सर्वसामान्यांचा सवाल;

वेध माझा ऑनलाइन - वेदांता फायरफॉक्स पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प सुद्धा गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. अशातच आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मिहानमध्ये मोठ्या स्वरूपातील नवीन गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरत आहे. मिहानला डिफेन्स एव्हिएशन हब म्हणून विकसित करण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते. पण, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला गेला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान तसंच रॉकेटचे इंजिन बनविणारी फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये येण्यास उत्सुक होती. परंतु, प्रशासकीय विलंबामुळे सुमारे 1,185 कोटींची प्राथमिक गुंतवणूक असलेला प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. एरोस्पेस आणि संरक्षणसंबंधित उपकरणे तसंच त्यांचे घटक बनविणाऱ्यांमध्ये सॅफ्रन ग्रुपचे नाव अग्रस्थानी आहे. या कंपनीने एमआरओ सुरू करण्यासाठी भारतातील काही ठिकाणांची यादी निश्चित केली होती. त्यामध्ये नागपूर येथील मिहानचा देखील समावेश होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीने जागेसाठी एमएडीसीशी संपर्क देखील केला. परंतु, जागेशी संबंधित विलंबामुळे हा प्रकल्प आता हैदराबाद येथे गेला आहे. काही महिन्यांपूर्वीच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलिव्हीर आंद्रेस यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन हैदराबाद येथील प्रकल्पाबाबत माहिती दिली.
आजघडीला मिहानमध्ये टाटा फ्लोअर बिम, रिलायन्स-डसॉल्ट फाल्कनचे सुटे भाग बनवित आहे. एअर इंडिया आणि इंदमार या दोन कंपन्याचे एमआरओ विमानांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पाहतात. या चार युनिटशिवाय डिफेन्स एव्हिएशन क्षेत्रातील एकही मोठी कंपनी गेल्या काही वर्षांत येथे आलेली नाही. ज्या कंपन्या येण्यास इच्छुक आहेत त्यांना जागा मिळण्यात विलंब होणे, जागा मिळाल्यानंतर अप्रोच रोड नसणे आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे.

असा आहे प्रकल्प?
भारतीय आणि परदेशी व्यावसायिक विमान कंपन्या लिप-१ए आणि लिप-१बी या प्रकारची इंजिने वापरतात. त्यांची देखभाल आणि दुरुस्ती या एमआरओमध्ये होणार आहे. यासाठी १,१८५ कोटींची थेट परदेशी गुंतवणूक आहे. या एमआरोमुळे प्रत्यक्ष ५००-६०० उच्च कुशल रोजगार निर्माण होणार आहेत.

खड्ड्याकडे दुर्लक्ष करत गाडी चालवल्याने आईचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुलावरच गुन्हा दाखल.; कोल्हापुरातील अजब प्रकार ;

वेध माझा ऑनलाइन - कोल्हापूर जिल्ह्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात काहींचा जीवही जातो. मात्र, आता कोल्हापूरातून एक अतिशय अजब प्रकार समोर आला आहे. यात खड्ड्याकडे दुर्लक्ष करत गाडी चालवल्याने आईचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुलावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महानगरपालिकेतील एका मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या अभियंत्याच्या आईचा खड्ड्यात पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. महानगरपालिकेच्या या अभियंत्याला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने आपल्या आईचा जीव गेलाने चांगलाच मानसिक धक्का बसला आहे. मात्र, रस्ता दुरुस्त करून या घटना टाळण्याऐवजी पोलिसांनी याचं खापर मृत महिलेच्या अभियंता असलेल्या मुलावरच फोडलं आहे.
याप्रकरणात पोलिसांनी अभियंता मुलावरच गुन्हा दाखल केला आहे. खड्ड्याकडे दुर्लक्ष करत गाडी चालवल्यानेच अभियंत्याच्या आईचा मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. खड्ड्यातून वाट काढत गाडी कशी चालवायची? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अपघात झाल्यानंतर महापालिकेने मुरुम टाकून हा खड्डा बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूक करणारे लोक जीव मुठीत घेऊन वाहनं चालवत असतात. अशातच पोलिसांनी अभियंत्यावरच याचं खापर फोडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Saturday, October 29, 2022

कराड अर्बनचे ‘सभासद संपर्क अभियान’ उत्साहात ; कराड अर्बन संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध...

वेध माझा ऑनलाइन - सभासद व बँकेचा सुसंवाद व्हावा या उद्देशाने कराड अर्बन बँकेने विभागवार सभासद संपर्क व प्रशिक्षण मेळावे आयोजित केले होते त्याला सर्वच ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे बँकेचे हे अभियान उत्साहात व यशस्वी पार पडले असल्याचे अध्यक्ष सुभाष एरम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले नेट बँकींगसंदर्भात रिझर्व्ह बँकेकडे आम्ही प्रस्ताव पाठवित असून रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळाल्यानंतर नेट बकींग सेवा सुरू करण्यात येणार आहे असा खुलासाही त्यांनी यावेळी सभासदांच्या माहितीसाठी केला

 यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम,  मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव तसेच सर्व नूतन संचालकांची उपस्थिती होती.

यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी, सभासदांना 5% लाभांश दिला आहे. त्याचप्रमाणे ज्या सभासदांची भागधारण रक्कम .2,500 पेक्षा कमी आहे त्या सभासदांनी किमान .2,500 चे भागधारणा करणे आवश्यक आहे असे सांगितले व ज्या सभासदांचे बँकींग व्यवहार सुरू नाहीत अशा सभासदांनी बँकींग व्यवहार सुरू ठेवावेत असे आवाहनही यावेळी केले.
बँकेने नुकताच 4500 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे,आता बँकेस 10,000 कोटींचा टप्पा पार करावयाचा असून यासाठी सभासदांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवण्याची अपेक्षा माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांनी यावेळी व्यक्त केली. 

कराड अर्बन संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध...
दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराडची संचालक मंडळ सन 2022 ते 2027 पंचवार्षिक निवडणूक सातारा जिल्हा निबंधक मनोहर माळी यांनी नुकतीच बिनविरोध झाल्याचे जाहीर केले
गटनिहाय नव-नियुक्त संचालक मंडळ खालीलप्रमाणे-
सर्वसाधारण गट- सुभाष रामचंद्र जोशी, सुभाष शिवराम एरम, समीर सुभाष जोशी, स्वानंद प्रविण पाठक, श्रीरंग गणेश ज्ञानसागर, महिपती निवृत्ती ठोके, विजय कोंडीबा चव्हाण, विनित चंद्रकांत एरम, अनिल आप्पासाहेब बोधे, चंद्रकुमार शंकरराव डांगे, महादेव गणपती शिंदे, राहूल अरूण फासे, महिला राखीव गट  - रश्मी सुभाष एरम, सुनिता दिलीप जाधव, 
अनुसूचित जाती/जमाती राखीव गट- राजेश विश्‍वनाथ खराटे,  राखीव गट - राजेंद्र नारायण कुंडले, इतर मागासवर्ग राखीव गट - शशांक अच्युतराव पालकर...

Friday, October 28, 2022

ओगलेवाडी येथे शॉर्ट सर्किटने आग लागून 43 शेतकऱ्यांचा सुमारे 40 एकर ऊस जळून खाक...

वेध माझा ऑनलाइन - ओगलेवाडी येथे शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत 43 शेतकऱ्यांचा सुमारे 40 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे गुरुवारी दुपारी डबल मळा येथे ही आग लागली शेतीचे जळून नुकसान झाल्याने भरपाईची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे...
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार टेंभू रोड रेल्वे स्टेशन फाट्याच्या दक्षिण बाजूस डुबलमळा आहे गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हनुमंत जगताप यांच्या शेतातील विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट झाल्याने त्यांच्या उसाला आग लागली वाऱ्याने ही आग डुबल मळा वनवे मळा गोवारेच्या हद्दीपर्यंत पसरली घटनेची माहिती मिळताच कराड पालिकेच्या अग्निशामकच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या या दलाने डुबल मळ्याच्या उत्तरे कडील आग आटोक्यात आणली मात्र दक्षिण व पश्चिम बाजूकडील आग विझवण्यात अपयश आले.. तब्बल तीन तास आगीचे तांडव सुरू होते या आगीमध्ये 43 शेतकऱ्यांचा सुमारे 40 एकर ऊस जळून खाक झाला.. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सचिव रामकृष्ण वेताळ माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी मंडलाधिकारी विनायक पाटील शेतकरी उपस्थित होते 
दरम्यान वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच लवकरच निरीक्षकांकडून पुढील कारवाई सुरू करण्याचे उपकार्यकारी अभियंता अमित आदमाने यांनी सांगितले मात्र जोपर्यंत नुकसान भरपाईचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत वीज पुरवठा सुरू करून देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले गरज पडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला

कराड पालिकेने दिवाळी काळात शहरातून गोळा केला तब्बल चार टन कचरा ;

वेध माझा ऑनलाइन - कराड पालिकेने काही तासात गोळा केला दिवाळी काळात झालेला तब्बल चार टन कचरा गोळा केला घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली गेली आहे हा कचरा काही तासातच कर्मचाऱ्यांनी गावातून गोळा केला आहे

कराड शहरात यावर्षी दिवाळी व लक्ष्मीपूजन धुमधडाक्यात साजरी झाली या दिवाळी व लक्ष्मीपूजनानिमित्त झालेला फटाक्यांचा कचरा कराड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही तासात स्वच्छ केला हा कचरा तब्बल चार टन निघाला सदरचा कचरा घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर नेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. कराड शहर स्वच्छतेबाबत नेहमीच जागरूक असते देशातील टॉप थ्री मध्ये असलेल्या या शहरातील पालिका अधिकारी व कर्मचारी नियमित सतर्क असतात गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर अगदी रात्रीच्या वेळीही पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नदीकाठ व शहर स्वच्छ केले होते तेव्हाही त्यांना मध्ये कचरा गोळा केला होता आत्ताही दिवाळीच्या पहिल्या दिवशी लक्ष्मीपूजनाला शहरात फटाक्यांची मोठी आतिषबाजी केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काही तासात कराड शहर स्वच्छ केले यावेळी तब्बल चार टन कचरा शहरातून गोळा केला या कर्मचाऱ्यांच्या तत्पर प्रयत्नामुळे आपणाला स्वच्छ सुंदर कराड नेहमीच पाहायला मिळते

हाय-वे वरील खड्यात चारचाकी पलटी होऊन कराडातील एकाचा मृत्यू ; 4 जण जखमी...

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांतुन गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात कराड येथील एकाचा मृत्यू झाला आहे या अपघातात 4 जण जखमी झाल्याचेही समजते

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर महामार्गावरील खड्ड्यांमुळे चार चाकी पलटी झाली आणि एकाला आपला जीव  गमवावा लागला आहे कराड येथील मुजावर कॉलनीतील वसीम सय्यद असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे तर हुजेपा सय्यद असे जखमी मुलाचे नाव आहे वसीम सय्यद हे तीन प्रवाशांसह आपल्या पंधरा वर्षीय हुजेपाला घेऊन त्यांच्या चार चाकी वाहनाने गावी निघाले होते पुणे सातारा महामार्गावरील कापूरहोळ उड्डाण पुलावर खड्डा चुकवताना एक दुचाकी समोर आल्याने त्यांनी ब्रेक दाबला यामुळे झायलो कार पलटी झाली आणि तिने तीन पलट्या खाल्ल्या मोठा आवाज आल्याने शेजारील पंपावरील प्रशांत सुके मनोज कोंडे व इतर प्रवाशांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले व उपचारार्थ दाखल केले उपचारापूर्वीच वसीम सय्यद यांचा मृत्यू झाला होता 
दरम्यान, होजेपा यांच्यासह जावेद इनामदार शेरोनिसा इनामदार शाहरुख मुजावर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत
दरम्यान, हे खड्डे आणखी किती जणांचे जीव घेणार? किती घरे उध्वस्त करणार ? हाच यानिमित्ताने संपुर्ण राज्यासमोरचा प्रश्न आहे दरवषी हजारोंच्या आकड्यासह अनेकजण आपला जीव रस्त्यावरच्या खड्यात गमावतात तरीही शासन याप्रश्नी गंभीर का नाही? हाच प्रश्न लोकांना आजही पडलेला आहे...

ठाकरे गटापुढे आणखी अडचणी वाढल्या ; अंधेरी पोट निवडणूक रद्द होणार ?

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. मागच्या तीन महिन्यांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आणखी एक समस्या त्यांच्यापुढे आली आहे. दरम्यान प्रतिष्ठेची मानली जाणारी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटासमोर आता नवा वाद समोर आला आहे. एका अपक्ष उमेदवाराने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून उमेदवारी मागे घेण्याबाबत दबाव आणला जात असल्याचा आरोप करून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे.

ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्वची निवडणूक लढवली जात आहे. यामध्ये प्रतिस्फर्धी विरोधक भापजने माघार घेतल्यानंतर ही निवडणूक सोपी मानली  जात असली तरी ठाकरे गटावर पुन्हा एकदा नवी समस्या उद्भवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय सुकर मानला जात होता. मात्र, त्यानंतर आता एका अपक्ष उमेदवाराने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून उमेदवारी मागे घेण्याबाबत दबाव आणला जात असल्याचा आरोप करून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे.
भाजपने माघार घेतल्यानंतर अन्य उमेदवार अद्यापही रिगणात असल्याने ठाकरे गटाकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. याबाबत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहित तक्रार केली आहे. या पत्रात उमेदवारी मागे घेण्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला  आहे. यामुळे ही पोटनिवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी मिलिंद कांबळे यांनी या पत्राद्वारे केली आहे.
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. तसे धमकीही देण्यात आल्याचा आरोप मिलिंद कांबळे यांनी केला होता. याशिवाय अन्य अपक्ष उमेदवारांवर दबाव टाकून त्यांनाही निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी तक्रार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
अंधेरी पोटनिवडणुपूर्वी आयोगाने आचारसंहिताही लागू केली आहे. 3 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत. अशातच आता अंधेरी पोटनिवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. आता नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Thursday, October 27, 2022

कोयना परिसराला भूकम्पाचा धक्का ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - कोयना परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान हा भूकंप झाला भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्चर स्केल इतकी होती मात्र कोयना धरणाला कोणताही धोका नाही अशी कोयना धरण व्यवस्थापनाने माहिती दिली आहे.

कोयना धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान कोयना परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला हा भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा होता तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस पाच किलोमीटर होता तसेच भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल होती.. दरम्यान या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाला या भूकंपापासून कोणताही धोका नसल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे..

कराडात गब्बर ग्रुप व शाहू चौक मित्र परिवाराचा दिवाळी फराळ कार्यक्रम दणक्यात साजरा ; दोन्ही ग्रुपच्या सामाजिक कार्याचे मान्यवरांकडून कौतुक ;

वेध माझा ऑनलाइन - शहरातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे गब्बर ग्रुप व शाहू चौक मित्र परिवाराच्या वतीने आज दिवाळी फराळ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दोन्ही ग्रुपचे कार्यक्रम आज एकाच दिवशी साजरे झाले दोन्ही ग्रुपच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेत आमदार बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांनी या ग्रुपच्या कार्यकर्त्यांचे यावेळी भरभरून कौतुकही केले
शाहू चौक मित्र परिवाराने हा कार्यक्रम पू.ना. गाडगीळ शोरूम च्या बेसमेंटला घेतला होता तर गब्बर ग्रुपचा कार्यक्रम पंतांच्या कोटातील सारडा लॉन याठिकाणी संपन्न झाला  
कराड शहरातील सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर असणारे हे दोन ग्रुप आहेत गब्बर व शाहू चौक या दोन्ही मित्र परिवाराने कोविड काळात खूपच आदर्शवत काम करून समाजकार्याची पद्धती व आदर्श आखून देत मी-मी म्हणणार्याला तोंडात बोट घालायला लावेल एवढं उत्तुंग कार्य करून दाखवले आहे
कोविड काळात रुग्णाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देण्यासह त्या रुग्णाला ऑक्सिजन  तसेच लागलेच तर रेडमिसिव्हर व इतर लागेल ती मेडिकल हेल्प करण्यासाठी वेळप्रसंगी अक्षरशः जीव धोक्यात घालून या दोन्ही ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आहे... 
मधल्या पूरपरिस्थितीत या दोन्ही ग्रुपने पूरग्रस्तांना  मदत करण्याचे मोठे प्रयत्न करत त्यावेळी त्यांच्या स्थलांतरित होण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून मदत केल्याचे शहराने पाहिले आहे...  रुग्ण गरीब असेल तर त्या रुग्णाला स्वखर्चाने इतर जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करत त्या पेशंटचे संपूर्ण बिल भरून त्याला डिस्चार्ज घेण्यापर्यंतचे जबाबदारीचे काम देखील या ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे सर्वपरिचित आहे... 
शहराची स्वच्छता मोहीम असो , वृक्षारोपण असो, रक्तदान शिबिराचे आजोजन असो किंवा सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण उपलब्ध करून देणे असो, गरिबांना थंडीत ब्लॅंकेटचे वाटप असो... अशी एक-दोन नाही तर प्रचंड कामांची लिस्ट या दोन्ही ग्रुपच्या नावे लिहिता येईल... या ग्रुपमधील दानशूर एकत्र येऊन जी मदत करतात त्यावेळी ते स्वतःचे नाव न पुढे करता आपल्या ग्रुपच्या नावे मदत करतात ही   या ग्रुपच्या कार्यकर्त्यांची खासियत आहे...शहरात सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर असणारे हे दोन्ही ग्रुप म्हणजे कराडकरांचा अभिमान आहेत... या दोन्ही ग्रुपने आज दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी खासदार श्रीनिवास पाटील,आ बाळासाहेब पाटील यांनी या ग्रुपच्या एकूणच सामाजिक कार्याबद्दल शाबासकी देत भरभरून कौतुक केले व त्यांच्या हातून यापुढेही होणाऱ्या कार्यास शुभेच्छा दिल्या...यावेळी उपस्थित निरनिराळ्या राजकीय पक्षाच्या मान्यवरांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून एकमेकाशी मनमुराद गप्पा मारत या दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला...
यावेळी काँग्रेसचे नेते ऍड उदयदादा पाटील, पृथ्वीराज बाबांचे पुतणे राहुल चव्हाण तसेच कराड पालिकेचे गटनेते सौरभ पाटील, राजेन्द्र यादव जेष्ठ नगरसेवक अण्णा पावसकर, फारूक पटवेकर, मलकपूरच्या नगराध्यक्षा सौ नीलम एडगे, कराड व मलकपूरचे बहुतांशी आजी माजी नगरसेवक तसेच भाजपसह बहुतांशी राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Wednesday, October 26, 2022

आनंदाच्या शिध्यातून कधी तेल तर कधी साखर गायब ; पैसे मात्र पूर्ण घेतले जात आहेत ; अनेकांचा तक्रारीचा सूर;

वेध माझा ऑनलाइन - राज्यात गरीबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिंदे सरकारने आनंदाचा शिधा वाटप सुरू केली आहे. मात्र हा आनंदाचा शिधा सुरुवातीपासूनच अनेक ठिकाणी वादात सापडला आहे. राज्यात काही ठिकाणी आनंदाच्या शिध्यातून तेल गायब झाल्याचं समोर आलं होतं. आता आनंदाच्या शिध्यामधून साखरच गायब झाली आहे. शिवाय आनंदाचा शिधा वाटप करताना लाभार्थ्यांकडून मात्र पैसे पूर्ण घेण्यात येत असल्याने लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणी हा शिधा पोहोचलेलाच नसून यामुळे अनेकांना अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही. तुळशी विवाहापर्यंत दिवाळी असते तोपर्यंत हा शिधा पोहोचेल असं अजब वक्तव्य आज मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतेच केले आहे
आनंदाचा शिधा घेण्यासाठी लाभार्थ्यांकडून पूर्ण पैसे घेतले जात आहेत. मात्र चार वस्तूंपैकी फक्त तीनच वस्तू काही ठिकाणी लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत त्यात कधी तेल तर कधी साखर  लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे समोर आले आहे
आधीच कोरोनामुळे दोन वर्षे दिवाळी साजरी करता आली नाही. त्यातच अजूनही अनेकांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही. तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाल्याने ते देखील संकटात सापडले आहे. अशात सरकारने घोषणा केलेल्या 'आनंदाचा शिधा' वाटपाच्या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र 'आनंदाचा शिध्या'तून कधी तेल तर कधी साखर गायब होत असल्यानं नागरिकांना अतिरिक्त पैशांचा भुर्दंड लागत आहे.

Tuesday, October 25, 2022

कराडच्या समस्त ब्राम्हण समाज सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन ; पुणे येथील प्रख्यात गायिका डॉ रेवा नातू यांच्या गायनाने कराडकर रसिक मंत्रमुग्ध...


वेध माझा ऑनलाईन - कराड 
येथील समस्त ब्राम्हण समाज सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व कराडकर प्रेक्षकांसाठी टाऊन हॉल येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पुणे येथील प्रख्यात गायिका डॉ रेवा नातू  यांनी यावेळी आपली गायन कला सादर करत उपस्थित रसिकांची भरभरुन दाद मिळवली यावेळी त्यांनी शास्त्रीय गायन, नाट्यगीत व अभंग गीते सादर केली 

पहाटे 6.30 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यांनतर तब्बल 2 तास कार्यक्रमाची रंगत वाढत गेली सादर झालेल्या सुरील्या सादरीकरणाने कराडकर रसिकप्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले दिवाळीची सुरुवातच पहाटेच्या संगीतमय सुरांनी सजली त्यामुळे शुभ-दीपावली हा संदेश प्रत्यक्ष सादर गायन कलेतूनच जणू अनुभवायला मिळाला अशी बोलकी प्रतिक्रिया काही रसिक प्रेक्षकांनी यावेळी दिली 

दरम्यान या कार्यक्रमात तबला साथ विनायक हसबनीस यांनी दिली तर हार्मोनियमची साथ सारंग सांभारे यांनी दिली साईड रिदम दिलीप आगाशे व गायन साथ सौ नियती आपटे यांनी दिली. 
कार्यक्रमाला माजी नगरसेवक सौरभ तात्या पाटील, घनश्याम पेंढारकर तसेच डॉ. मिलिंद पेंढारकर डॉ. अजय ब्रम्हनाळकर मुकुंद चरेगावकर यांच्यासह शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी संस्थेचे संचालक प्रशांत कुलकर्णी यांनी कलाकारांची ओळख करून दिली त्यानंतर संचालक अरुण प्रभुणे, ऍड. विक्रम कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत साने सौ पी डी कुलकर्णी बाई, सौ विनिता पेंढारकर, श्री अवधूत कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवर व कलाकारांचा सन्मान केला संस्थेचे अध्यक्ष  जयंत बेडेकर यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कराडमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रम सादर झाला त्यामुळे शहरातील रसिक प्रेक्षक व  कलाकारांसाठी ही पर्वणीच होती या सर्व रसिक प्रेक्षकांनी देखील समस्त ब्राम्हण सामाजिक संस्थेचे आभार मानले व अशा उपक्रमाचे प्रत्येकवर्षी आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत सादर झालेल्या कार्यक्रमाचे भरभरून कौतुकही केले 

Monday, October 24, 2022

अजय पावसकर मित्र परिवाराचा कराडात वसूबारस साजरी करण्यासाठी पुढाकार ; नागरिकांना पूजा व दर्शनासाठी गाय वासरूंची करून दिली उपलब्धता ; भाविकांनी व्यक्त केले समाधान ;


वेध माझा ऑनलाइन- 
 हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हा संघटक अजय पावसकर व मित्रमंडळाच्या वतीने नुकतीच दिवाळी वसूबारस साजरी करण्यासाठी शहरातून पुढाकार घेण्यात आला यावेळी या मित्रमंडळाने सोमवार पेठेसह शहरातील प्रमुख ठिकाणी वसू बारस दिवसाचे महत्व जाणून या दिवशी भाविकांना पूजा व दर्शनासाठी गाय वासरूची उपलब्धता करून दिली अनेक नागरिक व  महिलांनी या ठिकाणी दर्शन घेत समाधान व्यक्त केले

भाजपचे नेते विक्रम पावसकर  व त्यांचे बंधू अजय पावसकर मित्र परिवाराच्या वतीने गेली 10 ते 12 वर्षे विविध हिंदू सणांना सार्वजनीक स्वरूपात साजरे करण्यासाठी शहरात प्रयत्न केले जातात त्यासाठी प्रत्येक सणाला शहरातील नागरिकांना त्यांच्या वतीने प्रोत्साहन व या सणांच्या निमित्ताने शक्य ते सहकार्य केले जाते संक्रांत, वटपौर्णिमा, गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, दहीहंडी अश अनेक विविध सणांना ते पुढे होऊन साजरे करतात हिंदू एकता च्या माध्यमातून त्यांचे हिंदू समाजासाठीचे कार्य अहोरात्र सुरू असते 

ध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सुरु आहे वसूबारस या दिवाळीला सुरुवात करून देणाऱ्या पहिल्या दिवशी गाय वासरू चे पूजन करण्याची हिंदू संस्कृतीमध्ये प्रथा आहे याचेच महत्व जाणून घेऊन अजय पावसकर मित्र परिवाराने सोमवार पेठेसह संपूर्ण शहरात एकूण 10 ठिकाणी गाय वासरुची त्याठिकाणी  पूजा व दर्शनासाठी उपलब्धता करून दिली होती शहर व परिसरातील अनेक भाविकांनी त्याठिकाणी दर्शन घेत वसू बारस हा दिवाळीचा पहिला दिवस आनंदाने साजरा करत समाधान व्यक्त केले 
पावसकर बंधूंचे हिंदू सणांना सार्वजनीकरित्या साजरे करण्यासाठी प्रयत्न करणे सातत्याने सुरू असते या त्यांच्या कार्याचे नेहमीच कौतुकही होत असते

आनंदाचा शिधा गरजूंपर्यंत पोचलाच नाही ! अनेकांचा तक्रारीचा सूर ;

वेध माझा ऑनलाइन - दिवाळीनिमित्त राज्य सरकारने अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता दिवाळी साजरी होत असतानाही अद्याप अनेक गरजूना याचा लाभ मिळालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे 

आनंदाचा शिधा या सरकारच्या दिवाळी किटमध्ये चार वस्तूंचा समावेश आहे. गोरगरिबांना शिंदे फडणवीस सरकारने शंभर रुपयात हे कीट उपलब्ध केले आहे. त्यामुळे गरिबांच्या आनंदाचे वातावरण आहे परंतु  दिवाळीचा पहिला दिवस असताना अद्याप हे किट कराड पुरवठा शाखेपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात दुकानदारांकडे हे कीड जायला अद्याप अजून वेळ लागणार असून दिवाळी सुरू झाली तरी हे किट गोरगरिबांना मिळालेले नाही
गोडेतेल न आणल्याने या आनंदाची शिधा किटचे अद्याप वाटप करण्यात आलं नाही अशी माहिती मिळत आहे म्हणून लोक अद्याप या शिद्यापासून वंचितच राहिले आहेत. दिवाळी असून अजूनही अनेकांना शिधा वाटप न झाल्याने गरिबांची एकप्रकारे चेष्टाच झाल्याची प्रतिक्रीया यानिमित्ताने उमटत आहे

Sunday, October 23, 2022

शिंदे गटाचे 22 आमदार नाराज ? भाजप मध्ये जाणार? खुद्द शिंदे गटाच्या एका आमदाराने केला अंदाज केला व्यक्त ; शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या रोखठोक सदरामध्ये केला दावा ;

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेत फूट पाडून भाजपात गेलेल्या शिंदे गटाचे राजकीय भवितव्य काय, यावर अनेकजण विविध प्रकारचे अंदाज वर्तवत असतात.खुद्द शिंदे गटाच्या एका आमदाराने शिंदे गटाविषयी अंदाज व्यक्त केला असून त्यांनी म्हटले आहे की, भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रामदास आठवले होईल. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या रोखठोक सदरामध्ये हा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत असाही दावा त्यामध्ये केला आहे

सामनाच्या रोखठोक मध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या 'तोतया' गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत.
यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, 'शिंदे यांचा रामदास आठवले होईल. हे विधान बोलके आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. भाजपचे नेते सरळ सांगतात, शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्या वेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील. असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले?

सामनाच्या या लेखात पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नाही. देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत गेले व मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी  रेल्वेकडून महाराष्ट्र सरकारला हव्या असलेल्या जागेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी घेऊन आले.

धारावीच्या पुनर्विकासाचे संपूर्ण श्रेय त्यामुळे फडणवीस व भाजपकडे जाईल. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या घोषणेत राज्याचे मुख्यमंत्री कुठेच नाहीत.पोलिसांच्या बदल्यांत व आपले अधिकारी नेमण्यात त्यांना जास्त रस आहे.कारण त्यांच्या चाळीस आमदारांना ते सर्व करून हवे. गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी हे बदली प्रकरण मानले नाही,तेव्हा मुख्यमंत्री शिंदे नाराज झाले व सातार्‍यातील गावी गेले, असे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले. ते थेट क्रिकेटच्या मैदानात स्नेहभोजनाला अवतरले.मुख्यमंत्री व त्यांचा गट सध्या काय करतो? मूळ शिवसेनेच्या प्रत्येक कामात अडथळे कसे आणता येतील ते सर्व करतो.ठाण्यातील 'दिवाळी पहाट' कार्यक्रमासाठी शिवसेनेस तलावपाळी परिसर मिळू नये यासाठी पुन्हा हायकोर्टात जावे लागले
व ठाणे महानगरपालिकेने शिंदे गटाने सर्वप्रथम परवानगी मागितली या सबबीखाली खासदार राजन विचारे यांना परवानगी नाकारली.पण दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्क मैदानासाठी हा नियम पाळला नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भाजपने या अशाच कार्यात गुंतवून ठेवले आहे, असे सामनाच्या रोखठोक सदरात म्हटले आहे.


घाबरू नका, मी तुमच्या बरोबर ; औरंगाबाद येथे उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद ;

वेध माझा ऑनलाइन - परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद येथील दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. खचून जाऊ नका, तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू असं आश्वासन उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिलं आहे.

औरंगाबादेत उद्धव ठाकरेंचं मोठं स्वागत करण्यात आलं. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव ठाकरे थेट दहेगावातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यावेळी साहेब आमची दिवाळी गोड करा असं म्हणत शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडली. यानंतर ठाकरे शेतकऱ्यांना धीर देत काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे . सरकारला मदत मिळवून देण्यासाठी आपण भाग पाडू असं आश्वासन देत आधार दिला.
दरम्यान, राज्यातील सत्तांतरा नंतर प्रथमच उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद हा खरं तर शिवसेनेचा बाल्लेकिला मानला जातो परंतु शिवसेनेत जी काही बंडाळी झाली त्यामध्ये औरंगामधीलच जास्त आमदार शिंदे गटात गेले  त्यामुळे बालेकिल्ल्यातच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. राज्यातील सरकार कोसळल्या नंतर उद्धव ठाकरे प्रथमच औरंगाबादला गेले असून त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य आहे.

दिवाळीच्या आदल्या दिवशी अमिताभ बच्चन याना मोठी दुखापत ; kbc च्या सेटवर घडली घटना ; उपचारासाठी रुग्णालयात दाखल ;

वेध माझा ऑनलाइन - बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक अपघात घडला असल्याचं समोर आलं आहे. अमिताभ यांच्या पायाची नस कापली गेली, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. अमिताभ यांनी ब्लॉगवर अपघाताची माहिती शेअर केली आणि सांगितले की रक्त थांबवण्यासाठी काही टाके देखील लावले आहेत. ही बातमी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बातमी समोर आल्यापासून अमिताभ यांचे चाहतेही चिंतेत आहेत. अमिताभ लवकर ठीक व्हावेत अशी प्रार्थना करत आहेत.

रविवारी KBC च्या पुढच्या एपिसोडचे शूटिंग करत असताना त्यांचा अपघात झाला. अमिताभ यांचा पाय कापला गेला. अभिनेत्याच्या पायाच्या मागची नस कापली गेली. त्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांना त्यांच्या पायाला टाके घालावे लागले. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, "धातुच्या धारदार तुकड्याने डावा पाय कापला आणि नस कापली गेली. नस कापली की रक्त अनियंत्रित होते. मात्र कर्मचारी आणि डॉक्टरांच्या टीमने वेळीच केलेल्या मदतीमुळे तो आटोक्यात आला असून पायाला टाके पडले आहेत. ते लवकरच बरे होऊन पुन्हा शूटिंगला सुरुवात करतील असे समजते

Saturday, October 22, 2022

पाटणहून कराडला रुग्ण घेऊन निघालेल्या 108 या रुग्णवाहिकेला अपघात ; टायर फुटल्याने रुग्णवाहिका दुभाजकला धडकली ;

वेध माझा ऑनलाइन - पाटणहून कराडला रुग्ण घेऊन निघालेल्या 108 या रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने दुभाजकला धडकली. त्यानंतर गाडी पलटी झाली. सुदैवाने या अपघातातून सहाजण सुखरूप बचावले. निसरे फाटा येथे हा अपघात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला.

याबाबत माहिती अशी की, पाटण येथील ग्रामीण रुग्णालयामधून पिंपळोशी येथील अपघात झालेल्या रुग्णास घेऊन रुग्णवाहिका क्रमांक MH-14-CL-0407 ही कराड येथील कृष्णा हॉस्पिटलकडे निघाली होती. दरम्यान, निसरे फाटा येथे भरधाव रुग्णवाहिकेचा मागील टायर फुटला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. यात मागील बाजूचा टायरचा भाग तुटल्याने रुग्णवाहिका पलटी होऊन रस्त्याच्या मधोमध घसरत गेली. रुग्णवाहिकेत रुग्णाबरोबर आलेले नातेवाईक डॉक्टर व चालक असे सहाजण होते.
अचानक मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला राहणाऱ्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. तसेच रुग्णवाहिकेतील सहा जणांना बाहेर काढले. यामध्ये काहींना किरकोळ इजा झाली. यानंतर उब्रज येथील दुसऱ्या रुग्णवाहिकेस बोलवण्यात आले. 

एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न ; उंब्रज येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद ;

वेध माझा ऑनलाइन -  उंब्रज येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आज शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरीचा प्रयत्न करण्यात आला. कटावणीने उचकटून एटीएम मधील रोकड रक्कम लंपास करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला अशी माहिती उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली. चोरट्यांनी उंब्रज येथील एटीएमवर डल्ला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला खरा, मात्र एटीएम मॉनिटरिंग एजन्सीच्या सतर्कतेमुळे पोलीस घटनास्थळी तात्काळ हजर झाले. याबाबत सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले आहे अधिक तपास उंब्रज पोलीसांकडून सुरू आहे.

Friday, October 21, 2022

दिवाळीत ट्राफिक चा नियम मोडला तरी दंड होणार नाही ;

वेध माझा ऑनलाइन - आपण गाडी चालवत असताना नेहमीच ट्रॅफिकच्या नियमांची भीती आपल्या मनात असते. अपघातांचं प्रमाण कमी व्हावं आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जावं, यासाठीच मुळात हे ट्रॅफिकचे नियम बनवले असतात. ते पाळले जावेत, म्हणून उल्लंघन केल्यास योग्य तो दंड देखील वसूल केला जातो. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळित राहण्यास मदत होते. मात्र, दिवाळीचा उत्सव म्हणून नागरिकांना गुजरात सरकारने हा दंडच स्थगित केल्याचं दिवाळी गिफ्ट दिलं आहे! खुद्द गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनीच शुक्रवारी ही घोषणा केली आहे.

नेमकी काय आहे घोषणा?
दिवाळीच्या दिवसांमध्ये नागरिकांना दंडाच्या मनस्तापातून सुटका मिळावी, म्हणून गुजरात सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगिण्यात येत आहे. हर्ष सिंघवी यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना यासंदर्भात घोषणा केली आहे. “२१ ऑक्टोबरपासून २७ ऑक्टोबरपर्यंत ट्रॅफिक नियम तोडलेत, तर त्यासाठी तुमच्याकडून कोणताही दंड वसूल केला जाणार नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या संमतीने आपण हा निर्णय घेतला आहे”, असं हर्ष सिंघवी यावेळी म्हणाले.

कराडमध्ये जनकल्याण प्रतिष्ठान संचलित... सरस्वती विद्यामंदिर आणि विद्यालय यांच्या वतीने घेण्यात आलेले शालेय विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर उत्साहात संपन्न...

वेध माझा ऑनलाइन - कराड येथील जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर आणि विद्यालय यांच्या वतीने शालेय विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम अंतर्गत तीन दिवसीय शिबीर नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले
शिबिराचे उद्घाटन जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.शिरीष गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. सचिव अनिल कुलकर्णी, संचालक डॉ.प्रकाश सप्रे, दीपक कुलकर्णी, सुनील मुंद्रावळे, श्रीपाद कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
.
कलाविष्कार २०२२ या निवासी शिबिरात १६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कला व कलाकार यांचा प्रत्यक्ष सहवास मिळाला तसेच त्यांना त्या कलाकारांचे व्यक्तिमत्त्व, जवळून अनुभवताही आले. 

विविध सदरातून वेगवेगळ्या कलाकारांनी यावेळी आपली कला सादर करत आपले अनुभवदेखील शेअर केले त्यातून उपस्थित विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन देखील करण्यात आले
तीन दिवसीय चाललेल्या या निवासी शिबिराचा नुकताच समारोप झाला
शिबिरात वेगवेगळ्या केश रचना, वैशिष्ट्यपूर्ण खेळांची माहिती, मूर्तिकला मूर्तीशास्त्र विषयी मार्गदर्शन तसेच कराडमधील प्रीतिसंगम हास्यक्लबच्यावतीने हास्यकलाचे सादरीकरण करण्यात आले.छायाचित्रे त्याचे तंत्र, तसेंच हस्ताक्षर लेखन पद्धती,याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. संगीत रजनी या कार्यक्रमातुन यावेळी बहारदार गाणी सादर झाली त्याचप्रमाणे दांनपट्टा लाठीकाठी भाला व कुऱ्हाड चालवणे अशा साहसी खेळाचे सादरीकरण देखील यावेळी करण्यात आले शिल्पकलेचे सुंदर सादरीकरण देखील यावेळी झाले विविध प्रकारची वाद्ये व त्याची माहितीही या शिबिरातून विद्यार्थ्यांना देण्यात आली अशा विविधांगी कलाविष्काराने हे शिबीर संपन्न झाले

उत्कृष्ठ शिबीरार्थी म्हणून कु. वरदा चव्हाण, कु. मधुजा बर्वे,आणि चि. समर्थ करपे या विद्यार्थ्यांना यावेळी गौरवण्यात आले 
संस्थेचे सर्व संचालक, मुख्याध्यापक विजय कुलकर्णी यांच्या कल्पनेतून तसेच शिबिराध्यक्ष दीपक पाटील, स्वागताध्यक्ष सौ.सोनाली जोशी यांच्या नियोजनातून हे शिबीर यशस्वी पार पडले
शिबिर यशस्वी होण्यासाठी सौ.गौरी जाधव, सौ. रुपाली पाटील, सौ अबोली फणसळकर, सौ अनुराधा कुलकर्णी सौ.स्मिता पतंगे सुवर्णा काटकर, दिपाली काकडे, शिल्पा भुतकर, अवधूत तांबवेकर राहुल मोरे, प्रशांत मुंढेकर, विद्यादेवी जाधव, स्वाती जाधव, प्रतिभा चव्हाण यासह
संस्थेचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी पालक यांनी परिश्रम घेतले.

शिवशंकर पतसंस्थेला कुलूप!; पतसंस्थेच्या सभासद ठेवीदारांची पोलिसात धाव ; पोलिसांना दिले निवेदन ;

वेध माझा ऑनलाइनकराड शहरातील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्था ही अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने संस्थेच्या ठेवीदारानी आता दिवाळीच्या तोंडावरच शहर पोलीस स्टेशन गाठले आहे पोलिसांना या सर्वांनी मिळून निवेदन दिले आहे बऱ्याच दिवसापासून पतसंस्थेला टाळे लागल्याचे सभासद,ठेवीदारांच्या निदर्शनास आल्याने आज त्यांनी हे पाऊल उचलले आहे

पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेची चौकशी व्हावी तसेच सर्व ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत. चेअरमन संचालक भेटत नाहीत पतसंस्था बुडाली असल्याचा संशय आम्हास आहे सदर संस्थेची चौकशी करावी, प्रशासक नेमावे व ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे 







कराड शहरात दिवाळी सणानिमित्त सोमवार दि. 24 ते बुधवार दि. 26 पर्यंत सकाळच्या पाणी पुरवठा वेळेत बदल... वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - कराड शहरात दिवाळी सणानिमित्त सोमवार दि. 24 ते बुधवार दि. 26 पर्यंत सकाळच्या पाणी पुरवठा वेळेत बदल केला असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.

 सोमवारपासून पाणी पुरवठा पुढीलप्रमाणे- सोमवार पेठ पाण्याची टाकी सकाळी – 5.30 ते 6.30, सुर्यवंशी मळा पाण्याची टाकी (नेहमी प्रमाणे), रूक्मिणी नगर पाण्याची टाकी – सकाळी 6 ते 7, गजानन हाैसिंग सोसायटी पाण्याची टाकी (सकाळी नेहमी प्रमाणे), रविवार पेठ पाण्याची टाकी – सकाळी 6 ते 7, टाऊन हाॅल पाण्याची टाकी – सकाळी 6 ते 7, मार्केट यार्ड पाण्याची टाकी – (नेहमी प्रमाणे) असा बदल करण्यात आला आहे.

समीर शेख सातारचे नवे एस.पी....

वेध माझा ऑनलाइन - गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पदोन्नतीने सातारचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. यापूर्वीही साताऱ्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून समीर शेख यांनी धडक कामगिरी बजावली होती. तर सध्याचे एसपी अजय कुमार बन्सल नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. गृहमंत्रालयाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या आदेशानुसार राज्यातील 24 आयपीएस पोलिसांच्या अधीक्षकांच्या बदल्याचे आदेश निघाले होते. तर उर्वरीत प्रतिक्षा यादीत आहेत.

अजय कुमार बन्सल यांनी 7 ऑक्टोबर 2020 रोजी साताऱ्याचे एसपी म्हणून गडचिरोली येथूनच पदभार स्वीकारला होता. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी तब्बल 149 जणांच्या टोळीला जिल्ह्यातून तडीपार केले होते. तसेच संघटित गुन्हेगारी त्यांनी मोडीत काढत 85 जणांना तुरुंगात पाठवले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तब्बल 328 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. बन्सल यांनी 56, 57 च्या प्रस्तावद्वारे 91 जणांना तडीपार केले बंसल यांच्या कार्यकाळात एलसीबीने संपूर्ण जिल्ह्यात धडक कारवाई केली 18 खुनाचे गुन्हे उघडकिस जाणून 54 आरोपींना अटक केली. नऊ दरोड्याची प्रकरणे यशस्वीरित्या तपासून यामध्ये 46 जणांना अटक केली होती.
गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची सातारा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. समीर शेख यांनी साताऱ्यात उपअधीक्षक म्हणून पदभार 2018 मध्ये स्वीकारला होता. साधारण 17 महिने त्यांनी साताऱ्यात धडक कामगिरी केली आहे. 

Wednesday, October 19, 2022

छत्रपती शाहूंचे वंशज शिवसेनेत दाखल ; उत्तर महाराष्ट्रातील राजकारण बदलणार ; भाजप ला धक्का ! ;

वेध माझा ऑनलाइन - छत्रपती शाहूंचे वंशज आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र यशवर्धन कदमबांडे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी युवासेना सचिव वरुण सरदेसाई शिवसेनेचे धुळे नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात माजी खासदार सुभाष वानखेडे उपस्थित होते.

यशवर्धन कदमबांडे यांच्या शिवसेना प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला हादरा बसला असून उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार आहे. शिवसेनेला एक नवीन दमदार चेहरा मिळाल्याने शिवसैनिकांचे मनोबल वाढणार आहे. राजवर्धन कदमबांडे यांच्याकडे धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका जिल्हा बँक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक वर्षांपासून सत्ता होती. यशवर्धन कदमबांडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने निश्चितपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना अधिकचे बळ मिळणार आहे.

राज्यात 3 नवे कोरोनाचे व्हेरिएंट आढळले ; 18 जण सापडले बाधीत ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - दिवाळी  जवळ आल्यामुळे खरेदीसाठी बाजरपेठात लोकांची गर्दी वाढली आहे. अशातच कोरोना विषाणूच्या तीन नव्या व्हेरियंटचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेतच. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एक्सबीबी या व्हेरियंटचे 18 नवे रग्ण आढळले आहेत. तर बीक्यू.1 आणि बीए.2.3.20 या व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. नव्या कोरोना रुग्णांमुळे कोरोना विषाणूचा फैलाव आणखी होण्याची शक्यता आहे. जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा एक भाग असून त्यामुळे घाबरून न जाता कोरोना संदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तीन नव्या व्हेरियंटचे 20 रुग्ण आढळले आहेत. इन्साकॉग प्रयोगशाळांच्या ताज्या अहवालानुसार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये राज्यात एक्सबीबी या व्हेरियंटचे एकूण 18 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 13 रुग्ण हे पुण्यातील आहेत. नागपूर आणि ठाणे येथील प्रत्येकी दोन तर अकोला येथील एक रुग्ण आहे. या शिवाय पुण्यातच बीक्यू.1 आणि बीए.2.3.20 या व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. या सर्व रुग्णांची साथरोग शास्त्रीय माहिती घेण्यात येत असून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे सर्व रुग्ण सौम्य स्वरूपाचे आहेत. या 20 पैकी 15 जणांनी लसीकरण घेतलेले असून पाच जणांची माहिती अप्राप्त आहे. पुण्यातील बीक्यू.1 रुग्ण सौम्य स्वरूपाचा असून त्याचा अमेरिका प्रवासाचा इतिहास आहे.  जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा एक भाग असून त्यामुळे घाबरून न जाता कोविड संदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. 

मुंबईत बॉम्बस्फोटाची फोनद्वारे धमकी ; पोलीस यंत्रणा अलर्ट...

वेध माझा ऑनलाइन ; मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलीस कंट्रोल रुममध्ये काल रात्री 10 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. तसेच मुंबईत 3 ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती या फोन कॉलवरुन देण्यात आली आहे. या फोन कॉलनंतर एकच खळबळ उडाली आहे.

112 या हेल्पलाईनवर कॉल करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस घेत आहेत. अंधेरीतील इन्फिनिटी मॉल, जुहूचं PVR मॉल आणि डोमेस्टिक विमानतळाजवळील सहारा हॉटेलवर बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा एका कॉलरने केला आहे. दरम्यान, या फोन कॉलनंतर सहार विमानतळ पोलीस जुहू, आंबोली आणि बांगूर नगर पोलिस स्टेशन आणि सीआयएसएफ आणि बीडीडीएसच्या पथकाने तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी तासनतास त्या ठिकाणांची तपासणी केली. मात्र, पोलिसांना कोणतीही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू सापडली नाही. 

टेम्बु परिसरात मगरीचा वावर ; त्या परिसरातील ग्रामस्थ,मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा...

वेध माझा ऑनलाईन - कराड नजीक टेंभू येथील कृष्णा नदीत 8 फूटी मगरीचा वावर वारंवार दिसून येत आहे. तिचा व्हिडिओ काहींच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे तेथील परिसरात भीतीचं वातावरण आहे

गेल्या काही दिवसापासून भल्या मोठ्या मगरीचा वावर असून या मगरीचे दर्शन वारंवार शेतकरी ग्रामस्थ तसेच मच्छीमारांनाही होत आहे. बहुसंख्य वेळा कृष्णा नदीच्या काठावर ही मगर विश्रांती घेत असल्याचेही शेतकऱ्यांनी पाहिले आहे. या मगरीची विश्रांती कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. याबाबत टेंभू पोलीस पाटील यांनी वन विभागाशी संपर्क करून याबाबतची माहिती दिली. वन विभागाने या बाबीची गंभीर दखल घेत टेंभू येथील कृष्णा नदीच्या काठावर मगर प्रवण क्षेत्र असा फलक लावला आहे. सर्व शेतकरी ग्रामस्थ मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

किड्स सुपरस्टार मॉडलींग स्पर्धेमध्ये कराडच्या आयुष भंडीयाचे उत्तुंग यश ; सर्वत्र होतय अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव...

वेध माझा ऑनलाइन - ड्रीम प्रोडक्शन हाऊस  (दिल्ली) तर्फे  आयोजित  केलेल्या  इंडियास किड्स सुपरस्टार मॉडलींग स्पर्धेमध्ये कराड मधिल कु.आयुष ऋषिकेश भंडीया (वय-11वर्ष )याने सहभाग घेतला होता .त्यामध्ये तो फाइनलला पोहचला .फाइनल स्पर्धा ही जयपुरमध्ये होती यामध्ये आयुष बरोबर संपुर्ण भारतातून  विविध राज्यातून 400 मुलामुलीनी सहभाग घेतला होता त्या सर्वामध्ये महाराष्ट्रातून आयूष हा विजयी झाला  त्यानंतर सर्व राज्यातील पहिल्या 3 विनरमध्ये म्हणजेच 50 मुलामुलीं मध्ये टयालेँट फेरी घेण्यात आली त्यामध्ये आयुष ने डांस करुन परीक्षकांची व प्रेक्षकांची मने जिंकली व फाइनल स्पर्धामध्ये शेवट रांपवॉक स्पर्धा झाली आनी त्यामध्ये आपल्या कराड मधिल आयुष भंडीया याने विजयाला गवसणी घालुन  स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.ही स्पर्धा 2 दिवस जयपुर मधिल कौंटी इन्ं या भव्य होटेल मध्ये पार पडली.


ड्रीम प्रोडक्शन हाऊस चे डायरेक्टर शरद चौधरी यांनी सर्व स्पर्धक त्यांचे पालक तसेच प्रशिक्षकाचे आभार मानले.या स्पर्धेला प्रशिक्षक  म्हणून सेलेब्रेटी पाहुणे म्हणून प्रिंस नरुला (एम टी व्ही  रोडीज फेम) आरुशी हंडा(एम टि व्ही  स्पिल्त्स्वीला फेम) परिक्षण केले व सर्व विजयी स्पर्धकांना बक्षिसे प्रधान केली .
त्याचबरोबर आयुष ची चित्रपटांसाठी निवड झालेली आहे तसेच एका हिन्दी चित्रपटांचे शूटिंग सुरु झाले आहे.आयुषच्या या विजयासाठी अभिनंदन  व त्याच्या भावी कारकिर्दिसाठी शुभेछ्या.

Tuesday, October 18, 2022

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल ; पोलीस दलात मोठी खळबळ

वेध माझा ऑनलाइन - एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस दलातील महेश मारुती मगदूम असे संशयित पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, सातारा येथे पोलिस दलाची 48 वी कोल्हापूर परिशेत्रिय क्रीडा स्पर्धा 2022 नुकतीच संपली. या स्पर्धेत सहभागी असलेला कोल्हापूर पोलीस दलातील स्पोर्ट्समन संशयित आरोपी महेश मगदूम हा आहे. तो कबड्डीपटू आहे. त्याची प्रो कबड्डी लीगमध्ये देखील त्याची निवड झालेली होती. आता त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे सातारा ते कराड प्रवासा दरम्यान हा प्रकार घडला आहे

उंडाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. शोभा मधुकर शिंदे बिनविरोध : ऍड उदयसिंह पाटील यांच्या हस्ते शोभा शिंदे यांचा सत्कार :

वेध माझा ऑनलाइन - कराड दक्षिण मधील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या उंडाळे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ. शोभा मधुकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच बापूराव पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी शोभा शिंदे यांची वर्णी लागली.

या निवडीनंतर रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या हस्ते शोभा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रयत कारखान्याचे संचालक प्रदिप पाटील, सरपंच संगीता माळी, ग्रामपंचायत सदस्य दादासो पाटील, अजित कदम, गणेश पाटील, बापूराव पाटील, संगीता पाटील, ग्रामसेवक शरद चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उदयसिंह पाटील म्हणाले, सर्वसामान्य लोकांना सत्तेत बसविण्याचे काम स्व. विलासराव पाटील- काका यांनी केले. रयत संघटना तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कष्टातून उभी राहिली आहे. त्यामुळेच काका वारसदार म्हणून सर्वसामान्य लोकांना सत्ता मिळावी, यासाठी नेहमीच प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहीन. 

वेध माझा च्या वृत्ताची दखल ; शहरातील कचरा गोळा करण्याचे काम झाले सुरू ; शहरांतील अनेकांनी मानले वेध माझा चे आभार...

वेध माझा ऑनलाइन - वेध माझा च्या दणक्यांनंतर ठेकेदार व मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यात कचरा गाडी आजच सुरू करण्याबाबत चर्चा झाल्यानंतर कर्मचार्‍यांना पगारासह अडव्हान्स देण्याचे सबंधित ठेकेदारांने मान्य केले त्यामुळे शहरातील कचरा गोळा करण्याचे काम लगेचच सूरू करण्यात आले.वेध माझा च्या वृत्ताची दखल घेत हा प्रश्न लगेचच सुटला यामुळे वेध माझा चे अनेकांनी फोन करून आभार मानले

दिवाळी बोनस व पगार येथील पालिका कर्मचाऱ्याना दिला नाही त्यामुळे कंत्राटी कर्मचार्‍यांनी आज सकाळपासुन कचरा गोळा करण्याचे काम बंद ठेवले होते. काम बंद  ठेवण्याची भूमिका कर्मचार्‍यांनी घेतली होती.याबाबतचे वृत्त वेध माझा ने तात्काळ प्रसिद्ध करून शहरातील लोकांना याबाबत कल्पना दिली त्यानंतर शहरातून संतापजनक  प्रतिक्रिया उमटू लागल्या  
पालिका कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, ठेकेदार यांची त्यानंतर त्वरित मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याशी चर्चा होऊन याप्रश्नी तात्काळ मार्ग काढला  त्यानंतर कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घेत शहरातील कचरा गोळा करण्यास सुरुवात केली आहे 
दरम्यान, वेध माझा च्या प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने याविषयाबाबत त्वरित हालचाल होऊन हा प्रश्न आजच्या आजच मिटल्याने वेध माझाचे शहरातील अनेकांनी फोन करून आभार मानले...

Monday, October 17, 2022

आज कचरा घंटागाड्या शहरात फिरल्या नाहीत ; ठेकेदारांची मनमानी कारणीभुत असल्याची चर्चा ; संबंबधितांवर कारवाईं करणार ; मुख्याधिकारी डाके

 वेध माझा ऑनलाइन - रोज  सकाळी शहरातून फिरणाऱ्या कचरा घंटागाड्या आज एका जागेवरच थांबवण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने तसेच गेले दोन वर्ष बोनस न मिळाल्याने आज घंटागाड्या जागेवरच उभ्या राहिल्या असल्याचे समजले.ठेकेदारांची मनमानी हे यामागचे कारण असल्याचे समजते दरम्यान यासंबंधी दोषीवर कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले आहे.

शहरातून रोज सकाळी कचरा घंटागाडी गलोगल्ली फिरत असतात. परंतु आज केवळ नगरपालिकेच्या ठेकेदाराने आपली मनमानी केल्याने सर्व गाड्या टाॅऊन हाॅल येथे आज उभ्या राहिल्या आहेत. एकही गाडी बाहेर पडली नाही, त्यामुळे आता घरातील कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न नागरिकांच्या समोर उभा राहिला आहे. 
दरम्यान, नगरपालिका ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करणार आहे तसेच कराड शहरातील स्वच्छतेचे व कचरा गोळा करण्याचे कामही करून घेतले जाईल. नागरिकांची गैरसोय होवू दिली जाणार नाही. दोषीवर कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.

"दिलखुलास' या कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची विशेष मुलाखत ; राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून होणार प्रसारित...

वेध माझा ऑनलाइन - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. 

ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या ॲपवर मंगळवार, दि. 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत कराड नगपरिषदेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे. शहरातील दैनंदिन स्वच्छता, शहरातील नियमित कचऱ्याचे संकलन, सुशोभीकरण यावर भर देत आपल्या कामात सातत्य राखत कराड नगरपरिषदेने हे यश मिळविले आहे. 
वॉटर प्लस शहर, माझी वसुंधरा अभियानातही कराड नगरपरिषदेने उत्तम कामगिरी केली आहे. नगरपरिषदेच्या या प्रेरणादायी कार्याची माहिती कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून दिलखुलास कार्यक्रमात जाणून घेतली आहे. 

मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात येत आहे का? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याना संशय......

वेध माझा ऑनलाईन -  एमसीए  म्हणजे मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी अंधेरीची पोटनिवडणूक  बिनविरोध करण्यात येत आहे का? असा संशय महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पटोलेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे बोट दाखविले आहे. नाना पटोलेंनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे म्हंटले आहे.

 सध्या मुंबईत एमसीएची निवडणूक सुरु आहे. ही निवडणूक म्हणजे पैश्यांच्या खजिन्याची निवडणूक आहे. एमसीए म्हणजे पैशाचा खजिना. याच पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात आता राजकारण सुरु आहे. एक दोन नेत्यांनी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या मागणीला एमसीएच्या निवडणुकांचा वास येत आहे. असे मला निश्चितपणे वाटत असल्याचे नाना पटोले  म्हणाले.मला कोणावर आरोप करायचा नाही. एमसीएमध्ये जे काही सुरु आहे, त्यावर मी बोलतो आहे.महाराष्ट्रात आतापर्यंत तीन निवडणुका झाल्या. त्यात एकही निवडणूक बिनविरोध झाली नाही.एमसीएच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा असा चमत्कार घडतो आहे.त्यामुळे याला नक्कीच एमसीएच्या निवडणुकीचा वास आहे. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध झाली,तर त्याला आमचा विरोध नाही. बाकी जनता सूज्ञ आहे, असे नाना पटोले म्हणाले.


 

मोरगिरी ग्रामपंचायतीत झाले तब्बल 60 वर्षांनी सत्तांतर ; पाटणकर गटाला धक्का ;मंत्री शंभूराज देसाई गटाची एकहाती 7-0 अशी सत्ता...

वेध माझा ऑनलाईन - पाटण तालुक्यातील मोरगिरी ग्रामपंचायतीत तब्बल 60 वर्षांनी सत्तांतर झाले आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने पाटणकर गटाला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसला असून शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई गटाने एकहाती 7-0 सत्ता व लोकनियुक्त सरपंच पदी साै. अर्चना किरण गुरव यांनी जवळपास पावणेतीनशे मतांनी विजय मिळवला आहे. तर घाणव ग्रामपंचायत पाटणकर गटाने स्वतःकडे राखण्यात यश मिळवले. त्यामुळे दोन ग्रामपंचायतीत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. 

राष्ट्रवादीच्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वात मोरगिरी ग्रामपंचायत तब्बल 60 वर्षे सत्तेत होती. अखेर या मोरगिरी विभागातील अत्यंत महत्वाची असणाऱ्या ग्रामपंचायतीत शंभूराज देसाई यांच्या गटाने धक्का देत मोठे खिंडार पाडले. या ग्रामपंचायतीसाठी 1 हजार 258 मतदारांपैकी 985 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होती. घाणव येथे 532 मतदारापैकी 365 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.






ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा पहिला कल आला समोर ; महाविकास आघाडी आघाडीवर ; शिंदे-फडणवीस गट पिछाडीवर; भाजप राष्ट्रवादीत कडवी झुंज...

वेध माझा ऑनलाईन - राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायती निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. निकालाचा पहिला कल हातात आला आहे. आतापर्यंतच्या निकालामध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. तर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पिछाडीवर आहे. पक्षनिहाय निकालानुसार, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कडवी झुंज सुरू आहे.

18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. निकालाचा पहिला कल हातात आला आहे. 113 जागांचा निकाल हाती आला आहे.

यापैकी महाविकास आघाडी 46 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप आणि शिंदे युती सरकार हे 40 जागांवर आहे. तर भाजपने आतापर्यंत सर्वाधिक 23 जागा जिंकल्या आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी आणि बाळासाहेबांची शिवसेना 18 जागांवर आघाडीवर आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाला 15 तर काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान,  नंदुरबारमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. आतापर्यंत 11 जागांचा निकाल हाती आला आहे.

भाजपा - 05
काँग्रेस - ०4
राष्ट्रवादी - 01

बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट )- 01

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना - 00

दरम्यान,  ठाण्यात आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत शांततेत मतदान पार पडलं. नक्षलग्रस्त गडचिरोलीतही शांततेत मतदान पार पडलं. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे. या निवडणुकीची आज मतमोजणी होतेय... निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातील 342 ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यापैकी 10 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदांची बिनविरोध निवड झाली आहे. तर एका ठिकाणी एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे 331 ठिकाणी सरपंचपदासाठी आज मतमोजणी पार पडतेय. य़ा निवडणुकीत 1339 उमेदवार रिंगणात आहेत. तर  ग्रामपंचायत मधील 3490 सदस्यांच्या जागेपैकी 4, तर 712 ठिकाणी सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. डहाणू तालुक्यामधे 62 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये मुख्य लढत भाजप, शिंदे समर्थक आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये होत आहे.

मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार, ऋतुजा लटकेंचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा ; अंधेरी पोटनिवडणुकीसंबंधी भाजपाचा मोठा निर्णय

वेध माझा ऑनलाइन - भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा आहे. या निवडणुकीवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रामुळे वळण मिळालं. त्यानंतर वेगाने घडामोडी सुरु झाल्या आणि अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली.

“५१ टक्के आम्ही ती लढाई जिंकलोच असतो. आमची पूर्ण तयारी झाली होती. आम्ही रणांगणात असून, वॉर्डात जुळवाजुळव झाली होती. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आम्ही १०० टक्के निवडणूक जिंकणार होतो. पुढील निवडणुकीला एकच वर्ष शिल्लक आहे हा विचारही करण्यात आली. यापूर्वी भाजपाने अनेकदा असा निर्णय घेतलाआहे. ही संस्कृती आजची नसून अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून अनेक उदाहरणं आहेत,” असं चंद्रशेखखर बावनकुळे यांनी सांगितलं.



Sunday, October 16, 2022

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान ; सुमारे 25 वर्षांनंतर गैर गांधी परिवारातील सदस्याची होणार निवड ;

वेध माझा ऑनलाइन - : सुमारे 25 वर्षांनंतर काँग्रेस पक्षाध्यक्षपदी गैर गांधी परिवारातील सदस्याची निवड होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर या दोघांमध्ये आज ऐतिहासिक लढत होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीची चर्चा सुरू होती. अखेर तो दिवस आला असून आज काँग्रेसला गैर गांधी कुटुंबातील सदस्य मिळणार आहे.काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज (17 ऑक्टोबर) मतदान होणार आहे. पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा 19 ऑक्टोबरला होणार आहे.

काँग्रेस निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे
दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी AICC मुख्यालयात आणि देशभरातील 65 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरण अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री म्हणाले की सर्व राज्यांतील प्रतिनिधी, ज्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला आहे त्या उमेदवाराला आपापल्या मतदान, केंद्रांवर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मतदान करतील.

पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी AICC मुख्यालयात मतदान करणे अपेक्षित आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटकातील बल्लारी येथील संगनकल्लू येथील भारत जोडो यात्रेच्या शिबिराच्या ठिकाणी मतदान करतील आणि सुमारे 40 इतर भारत यात्री जे PCC प्रतिनिधी आहेत.

कोणत्याही AICC सरचिटणीस/राज्य प्रभारी, सचिव आणि संयुक्त सचिवांना त्यांच्या नियुक्त केलेल्या राज्यात मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

मतदानानंतर सीलबंद बॉक्स दिल्लीला नेले जातील आणि AICC मुख्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येतील.

मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतपत्रिका एकत्र केल्या जातील, जेणेकरून एखाद्या विशिष्ट राज्यातून उमेदवाराला किती मते मिळाली हे कोणालाही कळणार नाही, असे मिस्त्री म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.

पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी शेवटची निवडणूक लढत 2000 मध्ये झाली होती. तेव्हा जितेंद्र प्रसाद यांचा सोनिया गांधी यांनी दारूण पराभव केला होता

राज्य सहकारी बँकेच्या 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांची ईडी चौकशी होण्याची शक्यता ?

वेध माझा ऑनलाइन - राज्य सहकारी बँकेच्या 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची ईडीमार्फत पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात झालेल्या चौकशीचं प्रकरण पुन्हा रडारवर येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारनं दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांमधून पुन्हा चौकशी करण्याची मागणी सातत्यानं केली जात होती. या याचिकांना उत्तर देताना आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयाला पुन्हा चौकशी करण्यासंदर्भात लेखी पत्रक लिहून कळवलं आहे. या याचिकांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली होती. 

राज्य सहकारी बँकेच्या 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि 76 संचालकांची पुन्हा ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण साखर कारखाने विक्री व्यव्हाराशी निगडीत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात झालेल्या चौकशीचं हे प्रकरण पुन्हा रडारवर आलं आहे. त्याचं कारण म्हणजे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट. महाविकास आघाडी सरकारनं दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर याप्रकरणी अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या. त्याला उत्तर देताना आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयाला पुन्हा चौकशी करण्याचं लेखी कळवलं आहे. या याचिकांमध्ये अजित पवार आणि शरद पवारांच्या याप्रकरणातील भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांची चौकशी न करताच क्लोजर अहवाल दिली होता. यावर न्यायालयात विशेष सरकारी वकिल अजय मिसर यांनी ही नवी भूमिका मांडली. 

पुर्वीच्या सरकारनं दाखल केलेली कागदपत्रे मागितली आहेत. याप्रकरणी 18 नोव्हेंबरला पुढील चौकशी केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवार यांना आलेल्या ईडी नोटीशींपैकी हे एक प्रकरण आहे. ईडी चौकशी करणार असं आर्थिक गुन्हे शाखेनं कळवलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ईडी स्वतंत्र चौकशी करत नाही. सर्वात आधी गुन्हा दाखल होतो आणि त्यानंतर तो ईडीकडे वर्ग केला जातो. 

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण नेमकं काय? 
महाराष्ट्र राज्य सहकारी  बँकेच्या  संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी सूत गिरणी आणि साखर कारखान्यांसाठी कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले. परंतु या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेचे प्रचंड नुकसान होऊन बँक अवसायानात गेली. यात सुमोर 25 हजार कोटींचा घोटाळा झाला. ज्याला तत्कालीन संचालक मंडळ जबाबादार आहे,असा आरोप करून या प्रकराची चौकशी करावी अशी विनंती करणारी याचिका सुरींदर अरोरा यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याची दखल घेत हायकोर्टानं  नाबार्ड तसेच मुंबई पोलिसांचा अहवाल पाहता प्रथम दर्शनी गुन्हा दाखल होऊन चौकशी होणं गरजेचं आहे. असे आदेश ऑगस्ट 2019 मध्ये दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) या प्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र तपासाअंती कोणताही दखलपात्र गुन्हा घडला नसल्याचा निष्कर्ष नोंदवणारा सी समरी अहवाल पोलिसांनी सप्टेंबर 2020 मध्ये न्यायालयात सादर केला आणि प्रकरण बंद करण्याची विनंती केली. मुंबई पोलिसांच्या या 'सी समरी' अहवाला सुरिंदर मोहन अरोरा यांच्यासह अन्य याचिकाकर्त्यांनी विरोध करत याचिका दाखल केल्या आहेत.


  

अंधेरी पोटनिवडणुकीला नवे वळण ; राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेण्याचे दिले संकेत?

वेध माझा ऑनलाइन - अंधेरी पोटनिवडणुकीला आता नवे वळण मिळाले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेण्याचे संकेत दिले आहे. 'यापूर्वी अनेकदा योग्य पद्धतीने मागणी झाल्यावर असे निर्णय घेतले आहे, सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल' असं फडणवीस म्हणाले.

राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आमच्या उमेदवाराला समर्थन मिळावे म्हणून आशिष शेलार राज ठाकरे यांना भेटायला गेले होते. त्यावेळेस त्यांनी इच्छा आणि मत वक्त केली आणि आता तसे पत्र ही दिले आहे. यापूर्वी अनेकदा योग्य पद्धतीने मागणी झाल्यावर असे निर्णय घेतले आहे. आर आर पाटील असो किंवा काही दिवसांपूर्वीच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका असो. पण आता आम्ही उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता या पत्रावर विचार ही करायचा झाला तर मला तो एकटा करता येणार नाही. माझ्या पक्षात मी काही एकटा निर्णय घेत नाही' असं फडणवीस म्हणाले.
'बाळासाहेबांची शिवसेना पण आमच्या सोबत आहे. त्यामुळे मला मुख्यंमत्र्यांना पण विचारावे लागेल. पक्षातील माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. चर्चेअंतीच कुठलाही निर्णय घेतला जाईल' असं फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे यांच्या पत्रानंतर शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. जर तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराचं नाव घेत असेल तर भाजपच्या उमेदवाराने भरलेला अर्ज मागे घ्यावा. भाजपसाठी जी लाचारी पत्कारली आहे, ती नाकारावी आणि पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध करण्याचा पायंडा पाळावा, असं आवाहन राऊत यांनी केलं.
एखाद्या नेत्याचं निधन झालं तर पोटनिवडणूक ही बिनविरोध होत असते. विरोधी पक्ष सुद्धा आपला उमेदवार कधी उभा करत नाही. पण, या ठिकाणी आपलं दुर्दैव आहे की विरोधकांनी आपला उमेदवार उभा केला आहे. निवडणूक लढवावी असं त्यांच्या उमेदवाराला वाटत आहे. माझी इच्छा आहे, मला असं वाटलं होतं की, ही निवडणूक बिनविरोधच होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दिली.
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुक बिनविरोध करण्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांनी आवाहन केलं आहे. ऋतुजा लटके यांच्या आवाहनाला आता विरोधी पक्ष विशेषता भाजप कसा प्रतिसाद देतोय हे आता पहावं लागेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागून मोठी राजकीय घडामोड सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

राज ठाकरेंच देवेंद्र फडणवीस यांना पत्र ; अंधेरी निवडणूक न लढवण्याचा दिला भाजपला सल्ला ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन -  दिवंगत लोकप्रतिनिधीला आपण श्रद्धांजलीच वाहतो. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे' असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक लढवू नये आणि ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं असेही राज ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी अर्ज दाखल केला आहे.

रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा-प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीचं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं, अशी विनंती राज ठाकरे यांनी फडणवीस यांना केली.मी आमच्या पक्षातर्फे परिस्थितीत दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे, आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप नेते आशिष शेलार यांनी आज सकाळी भेट घेतली. बीसीसीआय खजिनदार झाल्यानंतर आशिष शेलार यांनी पहिल्यांदाच राज ठाकरे यांची भेट घेतली. भाजपकडून मुंबई महापालिकेची जबाबदारी आशिष शेलारांवर दिली आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ही भेट महत्वाची आहे.