वेध माझा ऑनलाइन - बिबट्या दुचाकीच्या आडवा आल्याने गाडी चालकाचा ताबा सुटला व दुचाकीस्वार तेथील नाल्यात जाऊन पडला त्यानंतर घाबरून बिबट्याचे तेथून पलायन झाले ही घटना नुकतीच तुळसण येथे शुक्रवारी रात्री घडली..
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री तुळसण येथे नागनाथ गंडे हा ऊसतोड मजूर दुचाकीवरून निघाला होता यावेळी रस्त्यावर मध्येच अचानक बिबट्या आडवा आला यावेळी घाबरलेल्या दुचाकी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने चालक गाडीसह बिबट्यालाही घेऊन नाल्यात जाऊन पडला यावेळी बिबट्याने भीतीने घटनास्थळावरून धूम ठोकली या घटनेत नागनाथ भोमाजी गंडे हे जखमी झाले असून त्यांना उंडाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले घटनेची माहिती कळताच वनक्षेत्रपाल तूशार नवले वनपाल बाबुराव कदम सुभाष गुरव सचिन खंडागळे वनसेवक हनुमंत कोळी वैभव शेवाळे तानाजी कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी मजुरा सोबत घटनास्थळाची पाहणी केली तसेच ऊसतोड मजुरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले गावातील ग्रामस्थ व शेतकरी यांनाही सतर्कता बाळगण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल तुषार नवले यांनी केले
No comments:
Post a Comment