वेध माझा ऑनलाइन। भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी कराड भाजपा शहराध्यक्ष श्री एकनाथ बागडी यांची निवड झाली असून. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात,मा.विक्रांतजी पाटील मा.मुरलीअण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनात भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष यांनी श्री विजयजी हरगुडे कामगार मोर्चा ची राज्य कार्यकारिणी मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात जाहीर केली आहे.
एकनाथ बागडी यांनी भारतीय जनता पार्टी कराड शहरामध्ये 15 वर्षे अत्यंत निष्ठेने व मोठ्या जोमाने काम सुरू ठेवले आहे. भारतीय जनता पार्टीचे विचार व पक्षाने केलेले काम अत्यंत निष्ठेने ते लोकांच्या पर्यंत पोहोचवत आहेत
एकनाथ बागडी यांची कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे, आमदार जयकुमार गोरे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अतुल भोसले,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य भरत नाना पाटील,भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, तसेच शहर पदाधिकारी,बूथ अध्यक्ष,केंद्र प्रमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत
No comments:
Post a Comment