कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्री यशवन्त डांगे याना नुकतीच नगर महापालिका आयुक्तपदाची संधी मिळालेली आहे याबाबतचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत
यशवन्त डांगे हे मागील काही वर्षांपूर्वी कराडचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते त्यावेळी त्यांची कारकीर्द बऱ्याच कारणांनी वादग्रस्त म्हणून चर्चेत राहिली होती त्यांच्या अशा वादग्रस्त करकीर्दीमुळे कराडमधून त्यांची तडकाफडकी उचलबांगडी देखील करण्यात आली होती
दरम्यान नगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते दोन दिवसापूर्वी राज्य शासनाने अमरावतीचे आयुक्त देविदास पवार यांची त्याठिकाणी नियुक्ती केली होती. या विषयाला 24 तास उलटले नाही तोच आता राज्य सरकारने नव्याने बदलीची प्रक्रिया केली आहे. या पदावर पिंपरी चिंचवडचे उपायुक्त यशवंत डांगे यांची नगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नुकतीच नियुक्ती केली आहे.
No comments:
Post a Comment