Monday, July 1, 2024

अंबादास दानवेनी केली शिवीगाळ /काय म्हणाले प्रसाद लाडना ?

वेध माझा ऑनलाइन।
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. या मुद्द्यावरुन सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेचे अंबादास दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना अतिशय शिवीगाळ केली.

सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे, हे वक्तव्य ज्याचं असेल त्याचं, ते लोकसभेत झालेलं आहे. त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का?, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. यानंतर सत्ताधारी आमदारांकडून आरडाओरड सुरु झाली. यावेळी अंबादास दानवे यांचा संयम सुटला. “ऐ माझ्याकडे हात करायचा नाही”, असं म्हणत अंबादास दानवे यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली.



No comments:

Post a Comment