10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी पुण्यात नोकरीची संधी निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ब्रिडींग चेकर्स पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे. पहा भरतीचा तपशील..
संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका
भरले जाणारे पद – ब्रिडींग चेकर्स
पद संख्या – 56 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – वैद्यकीय विभाग, दुसरा मजला आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी- ४११ ०१८.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुलै 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – पिंपरी चिंचवड
वय मर्यादा – १८ ते ४३ वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
No comments:
Post a Comment