Monday, July 8, 2024

कोयनेत मुसळधार ; धरणात किती टी एम सी पाणीसाठा ?

बंध माझा ऑनलाइन
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवकही वाढली आहे. सोमवार दि. 8 रोजी सकाळी आठपर्यंत एकूण 30.84 टीएमसी इतका पाणीसाठा धरणात निर्माण झाला आहे.

गेल्या चोवीस तासांत कोयना धरण क्षेत्रात 73, तर नवजा 112 व महाबळेश्‍वर 51 येथे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात 18,125 क्युसेक पाण्याची आवक आहे. या आवकेमुळे धरणात अडीच टीएमसी वाढ झाली आहे. इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. यामध्ये धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी तसेच तारळी येथे चांगला पाऊस झाला आहे. यामुळे याही धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणात 28 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.


No comments:

Post a Comment