Monday, July 8, 2024

पुढील 48 तासात पावसाची शक्यता;

वेध माझा ऑनलाइन
संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झालेली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सर्वत्र मान्सूनने हजेरी लावलेली आहे. हवामान विभाग रोज पावसाबद्दल अंदाज व्यक्त करत असतात. आज देखील हवामान विभागाकडून सध्या रोजी हवामान कसे असेल? याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने दिलेले माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अत्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे दिवसभर या ठिकाणी ढगाळ असे वातावरण असणार आहे. या ठिकाणी किमान 26 अंश सेल्सिअस आणि कमाल 30°c एवढे तापमान असणार आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या ठिकाणी मेघगर्जना होण्याची देखील शक्यता आहे. तसेच कोकण गोव्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.
.

No comments:

Post a Comment